अलीगड | अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकलीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्ये प्रकरणी आज (८ जून) एका महिलेसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींनी अटक केले आहे. या चिमुकलीची हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
SSP #Aligarh on murder of 2.5 years old girl: 4 people including main accused Zahid & his wife arrested. Body was wrapped in a cloth belonging to Zahid's wife. We've met victim family and they've demanded that the accused should be hanged till death. Charge-sheet to be filed pic.twitter.com/hGek7wrQLe
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 8, 2019
अलीगड पोलिसांनी यापूर्वी जाहीद आणि अस्लम या आरोपींना अटक करण्यात आली होती. तर आज तिसरा आरोपी मेहदी हसन आणि अन्य एका महिला आरोपीला अटक करण्यात आली. जाहीद आणि अस्लम यांनी या मुलीची गळा आवळून हत्या केली. तसेच मेहदी हसन आणि जाहीदच्या पत्नीने त्यांना हत्येसाठी मदत केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह अस्लमच्या घरी ठेवण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र मृतदेह ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तसेच चिमुकलीचा मृतदेह ज्या ओढणीत गुंडाळलेला होता. ती जाहीदच्या पत्नीची होती. तिलाही या हत्या प्रकरणात चौथी आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याची माहिती अलिगड पोलिसांनी दिली आहे.
अलीगढपासून तालानगरी पन्नास किलोमीटरवर आहे. चिमुकलीच्या वडिलांनी गावातीलच एकास ४० हजार रुपये उसने दिले होते. शिल्लक ५ हजार रुपये परत मागितल्याने तो संतापला. त्याने वाईट परिणाम होतील,अशी धमकी दिली. साथीदाराच्या मदतीने मुलीचा खून केला. जाहीद असे त्याचे नाव असून असलम हा त्याचा साथीदार त्याचा शेजारी आहे. अलीगढ पोलिसांनी चिमुकलीच्या हत्या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल टप्पल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, ३ फौजदारांसह एका शिपायास निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.