मुंबई | तुर्कस्तानमध्ये (Turkey) 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात (Earthquake) 237 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. तुर्कस्तानच्या गाझियान्टेप शहराजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते. या भूकंपामुळे तुर्कस्तान मोठा विध्वंस झाले आहे. या भूकंपानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक अडकल्याची भीती वाढली जात असून अनेक लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Anguished by the loss of lives and damage of property due to the Earthquake in Turkey. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. India stands in solidarity with the people of Turkey and is ready to offer all possible assistance to cope with this tragedy. https://t.co/vYYJWiEjDQ
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2023
तुर्कस्तान भूकंपानंतर हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे. तुर्कस्तानच्या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये भूकंपाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. तुर्कस्तानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ बीएनओ न्यूजने ट्वीट करत माहिती दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.