HW Marathi
देश / विदेश

भारताच्या सर्वात वजनदार जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली | इस्त्रो  या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने तयार केलेल्या सर्वांधिक वजनदार असलेल्या जीसॅट-११ या उपग्रहाचे आज बुधवारी(५ डिसेंबर) मध्यरात्री २.०७ वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून जीसॅट-११ ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली आहे. हा उपग्रह ग्रामीण क्षेत्रातील इंटरनेट क्रांतीसाठी मैलाचा दगड मानला जात आहे. यामुळे देशातील इंटरनेट स्पीड वाढण्यास मदत होणार असल्याचे ‘इस्त्रो’ने म्हटले आहे.

 

हा कम्युनिकेशन उपग्रह ५,८५४ किलो वजनाचा असून तो पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर दूरवर जाणार आहे. उच्च क्षमता असलेला हा उपग्रह पुढील वर्षात देशात प्रत्येक सेकंदाला १०० गीगाबाईट पेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात यामुळे इंटरनेट क्रांती होईल, असे ‘इस्त्रो’चे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे.

Related posts

… जेव्हा जिन्ना भगतसिंग यांना मदत करु इच्छितात

News Desk

आपच्या २० आमदारांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा

News Desk

Raksha Bandhan Special |पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा…

News Desk