HW News Marathi
देश / विदेश

इस्रोच्या ‘जीसॅट-7 ए’ या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा | भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) जीसॅट-११ या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आज (१९ डिसेंबर) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून इस्रोच्या जीसॅट-७ ए या संचार उपग्रहाचे देखील यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. जीएसएलव्ही-एफ ११ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने आज (१९ डिसेंबर) संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी जीसॅट-७ ए हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला आहे. जीसॅट-७ ए या संचार उपग्रहामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाच्या संपर्क यंत्रणा आणि लढाऊ क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. ‘जीसॅट ७ ए’ या संचार उपग्रहामुळे ड्रोन ऑपरेशनसाठी हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे.

त्याचप्रमाणे या उपग्रहामुळे हवाई दलाची विमाने आणि ग्राउंड रडार स्टेशन्स एकमेकांशी जोडली जाणार आहेत. ‘जीसॅट-७ ए’ या संचार उपग्रहासाठी सुमारे ५००-८०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. ‘जीसॅट ७ ए’ या उपग्रहामध्ये ४ सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर पॅनल्समुळे ३.३ किलोवॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

इस्रोने २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या जीसॅट-७ या उपग्रहामुळे हिंदी महासागरातील तब्बल २ हजार नॉटिकल माईल क्षेत्रातील नौदलाची लढाऊ जहाजे, पाणबुड्यांवर लक्ष ठेवणे अत्यंत उपयोगी ठरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | बुलढाण्यात कोरोनाचा राज्यातील ८ वा बळी

News Desk

Watch Video : हत्तींची रुग्णालयातील सफारी एकदा पहाच

Manasi Devkar

शरद पवार बोलले ‘तो’ राष्ट्रवादीचा अजेंडा, मात्र शिवसेनेचे हिंदुत्त्व जगजाहीर !

News Desk