फरीदाबाद । शहरी नक्षलवादाच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना ताब्यात घेतले आहे .पुण्याच्या विशेष न्यायालयाने यांचा जामीन अर्ज फेटाळताच पुणे पोलिसांनी भारद्वाज यांना ताब्यात घेतले आहे. हरियाणातील फरीदाबादमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती.
पुणे पोलिसांनी हरियाणा पोलिसांसोबत सर्व औपचारिकता रात्रीच पूर्ण केल्या. महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सकाळ होण्याची वाट पाहण्यात आली. पुणे पोलीस रात्री साडे बारा वाजता सुधा भारद्वाज यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
#bhimakoregaoncase: Activist and Lawyer Sudha Bhardawaj being taken by Pune Police from her residence in Haryana's Faridabad. Pune Court had rejected her bail plea yesterday pic.twitter.com/Sc8wD5IM0e
— ANI (@ANI) October 27, 2018
भीमा कोरेगाव प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून वर्नोन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी या दोघांना अटक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या वर्नोन गाेन्सालवीस यांना अंधेरीतून तर अरुण फरेरा यांना ठाण्यातून पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात अाल्याने पुणे पाेलिसांनी अटक केली होती. त्यांना अाज पुण्यातील शिवाजीनगर काेर्टात हजर करण्यात अाले असून सुनावणीला सुरुवात झाली अाहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.