HW News Marathi
Covid-19

आता सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांना पोशाखात मिळाली सूट

नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या या युद्धात सगळे जण लढत आहेत. कोरोनामूळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यात आणखी एक बदल म्हणजे वकिलांना व्हर्च्युअल सुणावणीदरम्यान नेहमीचा काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचे बंधन नसल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. यात बदल करत आला वकील केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतात. त्यामूळे सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांना आता काळा कोट घालण्याची गरज नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदनही जाहीर करण्यात आले आहे. ‘व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान वकील प्लेन पांढरा शर्ट, महिला वकील पांढऱ्या रंगाची सलवार-कमीज, साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरू शकतात. कोरोना संदर्भातील परिस्थिती कायम आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे’ असं यामध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांनी देवाला साकडं घालावं; गुलाबराव पाटलांचा सोमय्यांना सल्ला

Aprna

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी लागणार निकाल!

News Desk

मीरा- भाईंदर, ठाणेमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

News Desk