नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (१४ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामूळे १ ऑक्टोबरपर्यंत अधिवेशनात काय काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
This is a global scenario & we're not the only country going through it. But it should be priority of govt. I don't see this govt at the Centre talking extensively either about the economy or unemployment challenges. We should put it on priority: NCP's Supriya Sule in Lok Sabha https://t.co/yli6z5zGtp
— ANI (@ANI) September 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.