बिहार | बिहारमध्ये विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पाटण्यातील एम्स रुग्णालयात ते उपचारांसाठी दाखल झाले आहेत. यामुळे त्यांना काही काळ प्रचारापासून दूर रहावे लागणार आहे.
सुशील कुमार मोदी यांनी स्वतः ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. तरी माझ्या प्रकृतीची सर्व परिमाणं सर्वसाधारण आहेत. दोन दिवसांपासून थोडा ताप येत होता. तपासणीनंतर अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, चांगल्या उपचारांसाठी एम्स पाटणामध्ये दाखल झालो आहे. फुफ्फुसांचं सीटी स्कॅनही नॉर्मल आहे. लवकरच निवडणूक प्रचारासाठी मी हजर असेल.”
Tested positive for CORONA.All parameters perfectly normal.Started with mild https://t.co/cTwCzt88DL temp.for last 2 days.Admitted to AIIMS Patna for better monitoring.CT scan of lungs normal.Will be back soon for campaigning.
— Sushil Kumar Modi (@SushilModi) October 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.