HW News Marathi
देश / विदेश

सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष ?

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळूनही अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर, सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, “लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या जवळपास १४० नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे, आता यानंतरच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल”, अशी माहिती संडे गार्डीयनने दिली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपविली जाणार असल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून केवळ याबाबतची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे देखील जात होते. मात्र, आता अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

News Desk

#COVID19 : मुंबईत ८१ रुग्णांची नोंद, तर राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७४८वर

News Desk