HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

नवी दिल्ली | तेलंगणा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आसिफाबाद जिल्‍ह्‍यात वृक्षारोपणासाठी आलेल्‍या पोलिस दल आणि वन रक्षकांच्‍या समूहाला येथील जमावाने अत्यंत अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीत एका महिला पोलिस अधिकारी जबर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना मारहाण करणाऱ्या या लोकांमध्ये येथील ग्रामस्थांसह तेलंगाणा राष्‍ट्र समितीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

तेलंगणा येथील आसिफाबाद जिल्‍ह्‍यात सिरपूर कागजनगर येथे वृक्षारोपणासाठी आलेल्या पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसह वनरक्षकांच्या समूहावर एका मोठ्या जमावाने चक्क ट्रॅक्टरवर लाठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रॅक्टरच्या चालकाला वाचविण्यासाठी एक महिला पोलीस अधिकारी ट्रॅक्टरवर उभ्या राहिल्या असताना या जमावाने त्यांना देखील मारहाण केली. पोलिसांना मारहाण करणाऱ्या या लोकांमध्ये येथील ग्रामस्थांसह तेलंगाणा राष्‍ट्र समितीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता, तर या महिला अधिकाऱ्याला मारहाण करणारा व्यक्ती हा तेथील स्थानिक आमदारचा भाऊ असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता बेटांचे ही नामांतर

News Desk

महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

News Desk

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk