HW News Marathi
देश / विदेश

शिवसेना खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला मुंबई ATSकडून अटक

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकवणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राऊतांना धमकवणाऱ्या तरुणाचे नाव पलाश घोष असे आहे. मुंबई पोलिसांनी त्याला कोलकतामधून काल (१० सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. हा तरुण दक्षिण कोलकतामधील टॉलिगुंगे भागांत राहणारा आहे.

या तरुणाने संजय राऊतांना व्हिडिओ कॉलवरुन धमकवल्याचा आरोप आहे. पलाशला न्यायालयात हजर केले जार आहे. आणि त्यानंतर त्याचा ट्रांझिट रिमांड घेऊन त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. सध्या संजय राऊत संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जम्मू-काश्मीर भारताचे राज्य’, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली

News Desk

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk

देशाचे गृहमंत्री जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असूनही…!

News Desk