नवी दिल्ली | नववर्षाच्या मुहूर्तावर आंध्र प्रदेशमध्ये नवीन उच्च न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सी. प्रवीण कुमार यांनी शपथ घेतली आहे. कुमार यांनी राज्यपाल ईसीएल नरसिंहन यांच्या उपपस्थित मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मंत्रीमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Swearing-in ceremony of the newly appointed Andhra Pradesh High Court Chief Justice C Praveen Kumar and other judges being held at Indira Gandhi Municipal Stadium in the presence of CM N Chandrababu Naidu & Governor ESL Narasimhan pic.twitter.com/mcPA0j0wA5
— ANI (@ANI) January 1, 2019
राज्यपालांनी यावेळी १६ न्यायाधीशांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राजधानी अमरावती येथे या नवीन न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. या न्यायालयाच्या निर्मीतीमुळे देशात आता उच्च न्यायालयांच्या संख्येत वाढ होऊन २५ झाली असून नवीन सुरू झालेल्या या न्यायालयाचे ‘आंद्र प्रदेश उच्च न्यायालय’ असे नाव देण्यात आले आहे. कायदा मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने २६ डिसेंबर १०२८ रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.