HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

देशातील ‘या’ राज्यात १९ जूनपासून लॉकडाऊन वाढवला

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र, ही देशातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्यऐवजी उलटी वाढतच गेली. देशातील तामिळनाडू राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे तामिळनाडू राज्य सरकारने १९ जूनपासून ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाड राज्यातील  चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम या चार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, रुगणालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना वगळता पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या चार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, रुगणालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना वगळता पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

दरम्यान, घरापासून किमान दोन किलोमीटरच्या  परिसरातूनच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन तामिळनाडू सरकारने राज्यातील जनतेला  केले आहे. तसेच सरकारी कार्यालये ३३ टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कामावर येऊ नका असे सांगण्यात आले आहे. तामिळनाडूत रविवारी (१४ जून) १,९७४ नव्या कोराना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात आतापर्यंत ४४ हजार ६६१ जणांना कोरानाची लागण झाली असून ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Related posts

कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आले !

News Desk

तरूणींने घर भाडं न दिल्याने तरुणीकडून करून घेतली शरीरविक्री

News Desk

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे! 

News Desk