हैदराबाद । संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. तेलंगणा पोलिसांकडून या ४ आरोपींना घटनास्थळावर घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केल्याची माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
Hyderabad: Senior Police officials arrive at the site of the encounter. All four accused in the rape and murder of woman veterinarian in Telangana were killed in an encounter with the police when the accused tried to escape while being taken to the crime spot. https://t.co/TB4R8EuPyr pic.twitter.com/7fuG87MP0m
— ANI (@ANI) December 6, 2019
या चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत होते. ४ डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असे चारही आरोपींची नावे आहेत. हैदराबाद शहराबाहेर असलेल्या शमशाबादमध्ये २७ नोव्हेंबरच्या चार ट्रक चालक आणि क्लीनरने महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारले होत. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी आंदोलने गेली गेली.
Father of the woman veterinarian on all 4 accused killed in police encounter: It has been 10 days to the day my daughter died. I express my gratitude towards the police & govt for this. My daughter's soul must be at peace now. #Telangana pic.twitter.com/aJgUDQO1po
— ANI (@ANI) December 6, 2019
“माझ्या मुलीचा मृत्यू होऊन १० दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, या चारही आरोपींचा एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे.” अशी प्रतिक्रिया बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या वडिलांनी दिली आहे. “हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी एन्काऊंटर यांचा मला खूप आनंद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांची कामगिरीही कौतुकास्पद असल्याचे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे.”
Asha Devi, Nirbhaya's mother: I have been running from pillar to post for the last 7 years. I appeal to the justice system of this country and the government, that Nirbhaya's culprits must be hanged to death, at the earliest. https://t.co/VoT5iv2caf pic.twitter.com/5ICgJUYaNz
— ANI (@ANI) December 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.