नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. तेलुगू देसम पक्षाचे चार राज्यसभा खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण तेलगू देसममधून राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी असे पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिले आहे.
TDP MPs of Rajya Sabha- YS Chowdary, CM Ramesh, TG Venkatesh, join BJP in presence of BJP Working President JP Nadda. TDP Rajya Sabha MP GM Rao to formally join later as he is unwell. pic.twitter.com/IU6ximVYtd
— ANI (@ANI) June 20, 2019
तेलगू देसम पक्षाचे राज्यसभा खासदार सी.एम. रमेश, टी.जी. व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वाय. एस. चौधरी यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश करण्याची तयारी केली आहे. सध्या टीडीपीचे राज्यसभेत सहा खासदार असून सहापैकी चार खासदार एकत्र भाजपत सामील होत असल्याने त्यांना पक्षांतरबंदीचा नियमही लागू होणार नाही. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यपदी कायम राहतील.
TDP President N Chandrababu Naidu: We fought with BJP only for Special Category Status & state's interests. We sacrificed Central Ministers for Special Status, condemn attempts of BJP to weaken TDP. Crisis is not new to the party. Leaders & cadre have nothing to be nervous about https://t.co/ekpeusRBHu
— ANI (@ANI) June 20, 2019
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही भाजपशी लढा दिला. यासाठी आम्ही केंद्रातील मंत्रिपदांवरही पाणी सोडले. तेलगू देसमला दुर्बल बनवण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांचा मी निषेध करतो, असे धक्के पक्षासाठी नवे नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते निराश होणार नाहीत, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.