HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद

श्रीनगर | काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कश्मीरमध्ये पोलीस कुटुंबीयांना दहशवाद्यांकडून होणा-या त्रासाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरांवर छापे मारून कुटुंबीयांचे अपहरण केले.

या संदर्भातील वृत्त एका वृत्तवाहीनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याचे पोलीस खात्यांमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HatharasCase : पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला, बलात्काराचा उल्लेख नाही

News Desk

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना सामनातून उजाळा

News Desk

#Article370Abolished : पाकिस्तानचा जळफळाट, भारताविरोधात घेतले ३ मोठे निर्णय

News Desk
राजकारण

तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे

News Desk

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव नाशिक नगरसेवकांकडून मागे घेण्यात येणार असल्याची माहिती, नाशिक महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे. उद्या होणाऱ्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांकडून हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रांच्या मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याच्या आदेशामुळे नाशिकमधील नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. १ सप्टेंबर रोजी शनिवारी मुंढेंविरोधातील अविश्वास ठरावाबाबत बैठक होणार होती. परंतु त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिल्याप्रमाणे आता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत, अशी नगरसेवकांची भावना निर्माण झाली होती. नगरसेवकांचे निधी रद्द करणे, त्रिसूत्रीच्या निकषावर नगरसेवकांची कामे नाकारणे अशा अनेक प्रकारांमुळे नाशिक नगरसेवकांचे मुंढेंविरोधी मत तयार झाले.

मुंढेंच्या तडफदार कामाची सामान्य नागरिकांकडून प्रशंसा झाली. परंतु नगरसेवक आणि सत्ताधारी पक्ष कायमच यांच्या विरोधात राहिले आहे. मात्र सामान्य जनता आणि तरुणाईमध्ये मुंढे कायम त्यांच्या कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे लोकप्रिय राहिले आहेत.

Related posts

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

News Desk

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नव्हते !

News Desk