HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांचा वृत्तवाहिनीवर हल्ला

काबूल(वृत्तसंस्था): अफगाणिस्तानमध्ये शमशाद या वृत्तवाहिनीच्या मुख्यालयावर मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून २० पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले आहेत.

काबूलमध्ये शमशाद वृत्तवाहिनीचे मुख्यालय असून मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी अकराच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. वृत्तवाहिनीच्या प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवला आणि इमारतीमध्ये प्रवेश केला. हल्ल्यामुळे शमशाद वृत्तवाहिनीने प्रक्षेपणही थांबवले होते. घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाज येत होता. तसेच स्फोटांचे तीन आवाजही आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“हा संपूर्ण विषय मी अमित शहा यांच्या कानावर टाकणार”, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Aprna

महंत भास्करदास यांचे निधन

News Desk

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk
देश / विदेश

11 राजपुत्रांसह अनेक मंत्र्यांना अटक

News Desk

वृतसंस्था : सौदी अरेबिया भ्रष्टाचारप्रकरणी काही माजी मंत्र्यांसह ११ राजपुत्रांना अटक करण्यात आल्याचे वृत आहे . शनिवारी भ्रष्टाचारविरोधी आयोगाची स्थापना करण्यात आली होते . आयोगाने लगेच हि कारवाई केली आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी ही कारवाई करून आपले सिंहासन भक्कम केल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांची बँक खाती सील करण्यात आले असून यांची कसून चौकशी करत आहेत.

सौदी अरेबियाच्या नॅशनल गार्डचे प्रमुख युवराज मितेब बिन अब्दुल्लाह, नौदल प्रमुख आणि अर्थमंत्री यांचीही पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवराज मोहंमद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भ्रष्टाचारविरोधी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. अटक झालेल्यांत सौदीचे अब्जाधीश युवराज अल-वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे, असे वृत्त न्यूज वेबसाइटने दिले आहे. मात्र, याला अजून दुजोरा मिळाला नाही.

Related posts

टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन!

News Desk

गौरी लंकेश हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले

News Desk

Independence Day 2020 | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk