HW News Marathi
देश / विदेश

“हा संपूर्ण विषय मी अमित शहा यांच्या कानावर टाकणार”, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

मुंबई | “हा संपूर्ण विषय मी स्वत: हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याही कानावर टाकणार आहे,” असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोडसंदर्भात राज्यातील जनतेला दिला आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने आज (6 डिसेंबर) दगडफेक करत त्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावर कर्नाटक सरकार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललोय, मी नाराजी आणि चिंता देखील व्यक्त केली आहे. आणि या प्रकरणात तात्काळ कारवाई केली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिले आहे. तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. जे लोक अशा प्रकारच्या घटना करत आहेत. त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. आणि त्यांनी मला आश्वासन दिले की, सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण यासोबत हा संपूर्ण विषय मी स्वत: हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याही कानावर टाकणार आहे. कारण आपल्याला विकासाकडे जायाचे आहे. अशा प्रकारे राज्या-राज्यांमध्ये हे जर वातावरण होऊ लागले. तर हे योग्य नाहीय. सर्वात महत्वाचे आहे की, आपल्या संविधानाने कोणालाही कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. राहण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे एकाद्या राज्यामध्ये पायमल्ली होत असेल. तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचे काम केले पाहिजे. आणि जर असे लक्ष्यात आले की, राज्य सरकार रोखत नाही. निश्चित ते केंद्रपर्यंत घेऊन जावे लागेल. त्यामुळे आतातरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले. ते घडतोय की नाही ते मी पाहातोय, आणि त्यासोबत त्यासंदर्भातील सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे.”

 

संपूर्ण प्रकरण 48 तासात संपले नाही तर…

 

आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार  यांनी बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोडसंदर्भात दिला आहे. शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र एककीकरण समिती यांच्या लोकांच्या होणाऱ्या यातना. या सर्व गोष्टीत राज्य सरकार काय करतय हे बघून चालणार नाही. आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल.” कर्नाटक सरकारकडून कोणीही आमच्याकडे येऊ नये, चर्चा करून असे सांगितले जाते. आणि राज्य सरकार भूमिका का घेत नाही, केंद्र सरकारचा दवाब आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “केंद्राचा दबाव काय दोन्ही राज्यात त्यांची सरकार आहे. प्रश्न तो नाही. पण, आपण आजूनही संयम दाखवित होतो. जर हे असेच चालू राहिले. तर काय होईल हे काही सांगता येणार नाही.

संबंधित बातम्या

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; उपमुख्यमंत्र्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकच्या ‘या’ संघटनांकडून तोडफोड; सीमावाद चिघळण्याची शक्यता

 

Related posts

अतिरिक्त चलनसाठ्यावरून आरबीआय-सरकारमध्ये पुन्हा वाद ?

News Desk

#CoronaVirus | राज्याची चिंता वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा ४०० पार

News Desk

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…

Aprna