नवी दिल्ली | भारत-पाकिस्तान यांच्यातील बिकानेर जवळच्या सीमेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह १८-१९ ऑक्टोबरला दसरा साजरा करणार आहेत. या निमित्ताने तेथे शस्त्रपूजा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील सीमेनजवळ जाऊन शस्त्रपूजा करण्याची ही पहिलीच वेळ असून राजनाथ सिंह हे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दसरा साजरा करणार आहेत.
Union Home Minister Rajnath Singh to celebrate the festival of Dussehra with BSF jawans in Rajasthan’s Bikaner during two-day visit on 18 & 19 October. (File pic) pic.twitter.com/pQqwy3vbax
— ANI (@ANI) October 14, 2018
भारत-पाकिस्तान सीमेवर बिकानेरजवळ १९ ऑक्टोबरला शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राजनाथ सिंह हे सीमावर्ती भागातील छावणीजवळ ही शस्त्रपूजा करणार असून रामाने रावणावर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते. १८ ऑक्टोबरला एक रात्र गृहमंत्री छावणीत राहणार आहेत. नंतर १९ ऑक्टोबरला ते शस्त्रपूजा करतील. त्यानंतर जवानांसोबत ते बडाखानास उपस्थित राहणार असून सुरक्षा जवानांसमोर त्यांचे भाषण होईल. गेल्या वर्षी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवर जोशीमठ येथे दसरा साजरा केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.