श्रीनगर | भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास २५० दहशतवादी तर काश्मीर खोऱ्यात ३०० दहशतवादी सक्रीय असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सोमवारपासून चार टप्प्यांत या स्थानिक निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकांच्या एक दिवस आधीच निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
#JammuAndKashmir: Security tightened in Rajouri district ahead of Local Body Elections on 8th October. Police says, ”By and large district is peaceful. If there will be any inputs, we are watchful and equipped to deal with it. We have an integrated security approach.” pic.twitter.com/HQ8ijpikDd
— ANI (@ANI) October 6, 2018
पाकिस्तानच्या या कटाची माहिती मिळताच भारतीय जवानांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे लष्कर, पोलीस दल, सीआरपीएफ अशा सर्व सुरक्षा दलांना सुद्धा सावध राहण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले असून वाहने आणि संशयित व्यक्तींवर कडक नजर ठेवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडू नये यासाठीच पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली होत असल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.