नवी दिल्ली | देशातील गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित ७ हजार ५०० रूपये जमा करावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडू पुरेशा वैयक्तिक संरक्षणाची उपकरणे नसता नाही. हे सर्वजण स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्व योद्धांना आपण सलाम केला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्य आहे. कॉंग्रेस कार्यकारी समितीची आज (२३ एप्रिल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या कोरोनाशी सामना करण्याच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.
The doctors, nurses, paramedics, health workers, sanitation workers and essential service providers, NGOs and the lakhs of citizens providing relief to the most needy all over India, their dedication and determination truly inspire us all: Congress President Sonia Gandhi https://t.co/J9J9x4UB1d
— ANI (@ANI) April 23, 2020
कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, या प्रसंगी भाजपकडून जातीय पक्षपाती आणि द्वेषाचा विषाणू पसरवला जात आहे, असा आरोपही सोनिया गांधींनी यावेळी केला आहे. देशात लॉकडाऊनमुळे देशातील अनेक उद्योगधंदे ठप्प असून अनेक लॉकडाऊनमध्ये १२ कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित ७ हजार ५०० रूपये जमा करण्याची मागणी सोनिया गांधींनी यावेळी केली आहे.
BJP is spreading the virus of hatred and communal bias at the time when everyone together should fight coronavirus: Congress Interim President Sonia Gandhi during CWC meeting in Delhi (file pic) pic.twitter.com/TrE0QMCxbG
— ANI (@ANI) April 23, 2020
लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी अडचणीत आले असून कमकुवत आणि अस्पष्ट खरेदी धोरणांसह पुरवठ्याच्या साखळीत येणाऱ्या अडचणींनी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करायला हव्या. खरीप पिकासाठीही शेतकऱ्यांना सुविधा मिळायल्या हव्या.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.