HW News Marathi
देश / विदेश

देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी कन्हैया कुमार विरोधात तपास पूर्ण

नवी दिल्ली | दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिलेल्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज (१४ जानेवारी) विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या दोषारोपपत्रात जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, सैयर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांसह १० जणांची नावे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचे नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी जवळपास ३ वर्षांनंतर आज कन्हैया कुमारसह १० जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, और खलिद बशीर भट हे जम्मू आणि काश्मीर येथील रहिवासी आहेत.

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सभेत किंवा भाषणात कन्हैय्या कुमार यांच्याकडून सरकार चार्जशीट कधी दाखल करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आता, त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळू शकतो. दरम्यान, ९ फेब्रुवारीच्या आंदोलनावेळी, कन्हैय्या कुमार यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आंदोलक विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याचं या दोषारोपपत्रात म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासाला नवी चालना देणारे नितीन गडकरी, स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री

News Desk

आम्हाला हरवणे अशक्य- चिनची दर्पोक्ती

News Desk

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk