HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे!

मुंबई । काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू-गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असेच सर्व लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येत नाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे. काँग्रेसचे संघटन साफ कोसळले आहे. काँग्रेस कार्यालयाच्या इमारती उभ्या आहेत, पण त्यात ना जान ना हालचाली! नवीन कार्यकर्ते नाहीत व जे आहेत त्यांच्यासाठी काम नाही. चारेक राज्यांतील सरकारेही निपचित पडून आहेत. प्रमुख विरोधी पक्षांची भूमिका बजावण्यासाठी तरी थडग्यावरील धूळमाती झटकावी असेही त्यापैकी कुणाला वाटत नाही. देशासमोर व लोकांसमोर प्रश्न आहेत. प्रश्न निर्माण होतात तेव्हा जनता आशेने सरकारकडे न पाहता विरोधी पक्षांकडे पाहते, पण काँग्रेस राहुल गांधींच्या पायाकडे पाहत आहे. काँग्रेसला त्याच्या लायकीप्रमाणे योग्य फळ मिळाले आहे याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना राजीनाम्यानंतर काँग्रेसवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू–गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्लेअसेच सर्व लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येतनाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे. काँग्रेसचे संघटन साफकोसळले आहे. काँग्रेस कार्यालयाच्या इमारती उभ्या आहेत, पण त्यात ना जान ना हालचाली! प्रमुखविरोधी पक्षांची भूमिका बजावण्यासाठी तरी थडग्यावरील धूळमाती झटकावी असेही त्यापैकी कुणालावाटत नाही. देशासमोर व लोकांसमोर प्रश्न आहेत. प्रश्न निर्माण होतात तेव्हा जनता आशेने विरोधीपक्षांकडे पाहते, पण काँग्रेस राहुल गांधींच्या पायाकडे पाहत आहे. काँग्रेसला त्याच्या लायकीप्रमाणे योग्यफळ मिळाले आहे याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही.

सध्याचा काँग्रेस पक्ष गांधी परिवाराचा छळ करीत आहे असे दिसते. गांधी परिवार तसेच घराणेशाहीच्या सावलीतून (विळख्यातून) काँग्रेसने बाहेर पडावे असे राहुल गांधी यांनी ठरवले, पण काँग्रेस पक्ष उन्हात उभे राहून काम करायला तयार नाही व ते पुनः पुन्हा त्याच सावलीत जात आहेत. मुंबईतील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे दिले. बरं, पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामे दिल्याचे म्हणावे तर मग राजीनाम्यांसाठी इतका वेळ का लागावा? पुन्हा इतर राज्यांतही असेच राजीनामा सत्र सुरू आहे व हा राहुल गांधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. डॉ. कर्णसिंह यांनी या राजीनामा सत्रावर वेदना व्यक्त केली. ते म्हणतात, ‘‘राहुल गांधी हे एक सच्चे आणि प्रतिष्ठत गृहस्थ आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान व्हावा. त्यांच्यावर निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकणे बरोबर नाही.’’ काँग्रेस पक्षाच्या आजच्या अवस्थेस फक्त गांधी परिवार जबाबदार नाही, तर गांधी परिवाराच्या कृपेने मोठे वतनदार झालेले लोकच जबाबदार आहेत हे गेल्या महिनाभरातील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसला एक अध्यक्ष मिळत नाही, काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नाही. राहुल गांधी यांनी

राजीनामा मागे घ्यावा

यासाठी त्यांचे मन वळविण्यात काँग्रेसजनांनी एक महिना बरबाद केला. वास्तविक डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्य समितीची बैठक बोलवून नवा अध्यक्ष निवडता आला असता, पण काँग्रेसवाल्यांची शरीरे हत्तीची असली तरी मने उंदरांची आणि पाय मुंग्यांचे आहेत. राहुल गांधी यांनी एक साहसी पाऊल टाकले. त्याचा सन्मान करण्याऐवजी काँग्रेसवाले त्यांच्या पायाशी कोसळून आक्रोश करीत आहेत. मोदी किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध जोरकसपणे तर सोडा, पण थोडेदेखील लढण्याचे धाडस काँग्रेस पक्षाकडून दिसले नाही याचे एक कारण काँग्रेसच्या या अधू आणि पंगू मानसिकतेत आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला अक्षरशः पायाखाली तुडवलं. काँग्रेसवाले गांधी परिवाराच्या कृपेने ऐयाश झालेच होते, पण ते आयतोबादेखील आहेत. देशातील राजकीय परिस्थितीचे भान त्यांना नाही. कर्नाटकात भाजपने त्यांचा पक्ष साफ पोखरला आहे. तेथील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याच्या बेतात आहे, पण त्या पक्षाचा एकही वतनदार आपल्या पक्षाची प्रतिष्ठा व पत सावरण्यासाठी धडपड करताना दिसत नाही. सगळे जण छातीवर हात आपटत राहुल गांधी यांच्या दारात उभे आहेत. चार राज्यांत विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यावर

पक्षाची भूमिका

काय? कसे लढायचे? काय करायचे? यावर चर्चा नाही, पण ‘‘राहुल गांधी, राजीनामा मागे घ्या!’’ यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन काँग्रेसवाल्यांचा खरा चेहरा समोर आणला. काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू-गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असेच सर्व लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येत नाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे हेच बरे. काँग्रेसचे संघटन साफ कोसळले आहे. काँग्रेस कार्यालयाच्या इमारती उभ्या आहेत, पण त्यात ना जान ना हालचाली! नवीन कार्यकर्ते नाहीत व जे आहेत त्यांच्यासाठी काम नाही. चारेक राज्यांतील सरकारेही निपचित पडून आहेत. प्रमुख विरोधी पक्षांची भूमिका बजावण्यासाठी तरी थडग्यावरील धूळमाती झटकावी असेही त्यापैकी कुणाला वाटत नाही. देशासमोर व लोकांसमोर प्रश्न आहेत. प्रश्न निर्माण होतात तेव्हा जनता आशेने सरकारकडे न पाहता विरोधी पक्षांकडे पाहते, पण काँग्रेस राहुल गांधींच्या पायाकडे पाहत आहे. काँग्रेसला त्याच्या लायकीप्रमाणे योग्य फळ मिळाले आहे याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाम नबी आझाद यांच्या कार्याला उजाळा देत शरद पवारांनी सांगितला एक किस्सा

News Desk

माहिती अधिकारातील बदल म्हणजे जनतेचा विश्वासघात !

News Desk

कार्ती चिदम्बरम यांच्या घरावर ईडीचे छापे

News Desk