HW News Marathi
देश / विदेश

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक; कोरोना आणि राज्यसभासंदर्भात होणार चर्चा

मुंबई | राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आज ( ६ जून) सायंकाळी ४ वाजता मंत्रिमंडळाच्या बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. पण, राज्यात राज्यसभेसाठी सात उमेदवार मैदानात आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आणि शिवसेनेने दोन उमेवार दिली असून भाजपने राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने एक उमेवार मागे ध्यावा आणि महाविकासआघाडी विधान परिषदेची एक जागा लढणार नाही, अशी ऑफर महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने दिली आहे. परंतु, भाजपने महाविकासआघाडीची ऑफरला स्पष्ट नकार दिला. 

या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी मतांची जुळवा जुळव करणार आहे. राज्यसभेत निवडून येण्यासाठी उमेवारांना ४२ मतांचा कोट्यांची गरज आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेवारांना आपल्या बाजुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात काल (५ मे) १ हजार ४९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकेवर काढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घाण्याचे नागरिकांना आवाहन त्यांनी केले होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करत दिली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जल्लोष कर्नाटक विजयाचा…

News Desk

न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान

Aprna

गुजरात मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Aprna