HW News Marathi
देश / विदेश

फेसबुकचा सर्वेसर्वा झाला दुसऱ्यांदा झाला बाप.. मुलींला पत्रातून दिल्या शुभेच्छा

सॅन फ्रान्सिस्को फेसबुकता सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याला दुसरी कन्या झाली असून तिचे ऑगस्ट असे नाव ठेवण्यात आले आहे. फेसबुक पोस्टद्वारे झुकेरबर्गने आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. त्यासोबत दोघांनी ऑगस्टसाठी तिनशे शब्दांचा समावेश असलेले पत्रही लिहिले आहे.

फेसबुकवर झुकेरबर्गने पत्नी आणि दोन मुलीसह फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर आपल्या मुलीसाठी त्याने एक पोस्टही लिहली आहे. प्रिय ऑगस्ट, तुझी आई आणि मला इतका आनंद झाला आहे की, तो व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमच्‍याकडे शब्‍द नाहीत. ज्यावेळी तूझ्या मोठ्या बहिनीचा जन्म झाला होता तेव्हा आम्ही जगासाठी पत्र लिहले होतं. ऑगस्ट, तू एका अशा जगात जन्माला आली आहे. जिथे तूला उत्कृष्ट शिक्षण मिळेल. समानता असेल. रोगराईला कोणताही थारा नसेल. कौशल्य विकास आणि समानतेला प्रोत्साहन यावरच तुमच्या पिढीचा भर असावा, सर्वांना शिक्षण मिळावे, रोगांचे उच्चाटन व्हावे, लोक आपापसांत जोडले जावेत आणि सशक्त समाज उभा राहावा, असे आम्हाला वाटते.

ऑगस्ट, तू ज्या पिढीमध्ये जन्माला आली आहे. इथे विज्ञान आणि तंत्रज्ञानात सतत प्रगती होत राहिल. यामध्ये तू चांगले आयुष्य जगू शकशील. तूला आमच्यापेक्षा चांगले आयुष्य जगता येईल हे आमची जबाबदारी आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारी आहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले आहेत.

पत्राच्या शेवटी झुकेरबर्गने म्हणतो, ऑगस्ट. आयुष्य सुंदर जगायला लावणारी पहिली पायरी म्हणजे बालपण. बालपण खरच छान असतं. सारं जग कसं मोकळं रान असतं. त्या चिमुकल्या पंखांना … आभाळ देखील या वयामध्ये लहान वाटतं. तू भविष्यबद्दल चिंता करु नकोस. बालपण हे फक्त एकदाच मिळते. ते मनसोक्त जग. तूझ्या भविष्याची चिंता करण्यासाठी आम्ही आहोत. वी लव यू सो मच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी’ यांच्या नावाने नव्या पुरस्काराची राज्य सरकारकडून घोषणा!

News Desk

गुजरातपासून होणार सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी

News Desk

“महाराष्ट्र किती मोठा आहे ठाऊक आहे का?”, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk