नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णय, अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, असा निकाल सर्वोच्च न्यायालायाने दिला आहे. अयोध्या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एकमताने झाला असून या जागी ३ महिन्यात राम मंदिर उभारण्याचे आदेश न्यायालायने दिले आहे. तसेच राम मंदिरसाठी राम ट्रस्ट स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे. आणि न्यायालयाने रामलल्लाचे अस्तित्त्व मान्य केले आहे.
Supreme Court orders that Central Govt within 3-4 months formulate scheme for setting up of trust and hand over the disputed site to it for construction of temple at the site and a suitable alternative plot of land measuring 5 acres at Ayodhya will be given to Sunni Wakf Board. pic.twitter.com/VgkYe1oUuN
— ANI (@ANI) November 9, 2019
तसेच मुस्लिमांना अयोध्येत ५ एकरी पर्यायी जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने निकाल दिला आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.