HW News Marathi
देश / विदेश

अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, पण…! – जो बायडेन

नवी दिल्ली | गेल्या सात दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशात युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका युक्रेनच्या बाजुने उभी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज (२ मार्च) अमेरिकेतील अमेरिकेच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ला  संबोधित करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अमेरिका युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही, परंतु, युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याला मनमानी करू देणार नाही,” असे स्पष्ट संकेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुतीनला दिले आहे. आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात अमेरिकी सैन्य पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. 

जो बायडन म्हणाले, “रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाची पुतीनला किंमत चुकावी लागेल. रशियावर आम्ही आर्थिक निर्बंध लादणार आहोत. फक्त अमेरिकाच नव्हेत कर युरोपियन संघातील २७ राष्ट्र देखील युक्रेनसोबत या युद्धात त्यांच्या पाठिशी उभे आहेत. अमेरिकेने रशियाची हवाई हद्द बंद केली असल्याची घोषणा यावेळी केली. पुतीन हे हुकूमशहा आहे. त्यामुळे रशियाविरोद्ध युक्रेन अशी लढाई नसून हुकूमशहा विरुद्ध स्वातंत्र्य आहे. युक्रेनच्या जमीनीच्या एका-एक इंचाचे अमेरिका आणि नाटो देश रक्षण करणार आहेत, असे ते म्हणाले

“आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही युक्रेनियन आहोत – युक्रेनच्या अध्यक्ष 

 युरोपियन संसदेने काल (१ मार्च) विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत युक्रेनच्या अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार झेलेन्स्की सहभागी झाले होते. यात झेलेन्स्की बोलताना म्हणाले, “”आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रशियाने युक्रेवर युद्ध पुकारल्यापासून जगभरातील देशांनी रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमधून सैनिक मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, रशियाने अद्यापही त्यांचे सैन्य युक्रेनमधून मागे घेतले नाही. युक्रेनला नुकतेच युक्रेनला युरोपियन देशात सामील करून घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदारांचा ३० टक्के पगार या संपूर्ण वर्षभरासाठी कपात करणार

swarit

“कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही कारण…”,उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले उत्तर

News Desk

सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकाराच्या अंतर्गत

News Desk