HW News Marathi
देश / विदेश

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

पाटणाः बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. हत्येनंतर रात्रभर ती महिला शेजारी मृतदेह ठेवून प्रियकरासोबत झोपली. सकाळी उठल्यानंतर दोघांना मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. दोन दिवसानंतर या महिलेने पोलिस ठाणे गाठून आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांना लालबाग परिसरातून एक मृतदेह आढळून आला असून तो या महिलेचा पती असल्याचे स्पष्ट झाले. छोटू मंडल असे त्याचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. तो त्या महिलेचा पती होती. तो वायरमन होता. त्याच्या कार्यालयातील कुणाल कुमार भारतीसोबत त्याची मैत्री होती. दोघे एकाच ठिकाणी राहायचे. कुणाल छोटूच्या घरी ये-जा करायचा. दरम्यान, छोटूच्या पत्नीचे कुणालवर प्रेम जडले. तिच्या नवऱ्याला जेव्हा या प्रेमप्रकरणाची जाणिव झाली तेव्हा तो त्याला विरोध करू लागला. तिच्यावर त्याने बंधने घातली. यामुळे ललिताने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला. दोघांनी मिळून घरात झोपलेल्या छोटू मंडलच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केल्याने छोटू जागीच गतप्राण झाला. छोटूचा भाऊ राजेश कुमार मंडलने सांगितले की, छोटूने दहा वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते. मुलगी आंतरजातीय असल्याने घरच्यांनी त्याच्यासाठी घराची दारे बंद केली. त्यामुळे तो पत्नीसह शहरात राहण्यासाठी आला होता. कुटंबांचा गाडा सुरळीतपणे सुरू असताना छोटुच्या मित्राने विश्वासघात करून संपूर्ण कुटुंब उध्वस्त केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार पंतप्रधान मोदी

News Desk

छत्तीसगडमध्ये चकमक, १० नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

एवढ्या उंचीवर गेलात की, पायाखालची जमीन दिसणे बंद झाले !

News Desk