नवी दिल्ली | “पाकिस्तान जर दहशतवादाच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याबाबत गंभीर असेल तर त्यांनी दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यांच्यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे”, अशी मागणी भारताकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानातच असूनही पाकिस्तानने त्याच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.
Sources: India knows there are no.of Indians in Pakistan.Pak can hand over Indians that are in India's wanted list&international terror list-Dawood Ibrahim&Sayeed Salahudeen. Very specific details were shared, if Pak thinks India can't verify,it can get international verification pic.twitter.com/plE3S748w6
— ANI (@ANI) March 16, 2019
दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यांच्यासह आणखीही काही दहशतवादी पाकिस्तानात असून त्यांना भारताच्या ताब्यात अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला मोठ्या आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताला शांततेच्या चर्चेसाठी आमंत्रित करण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.