नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासात १ हजार २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली असूनर देशभरात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या २१ हजार कोरोनाचे रुग्णांची संख्या असून देशात १६ हजार ६८९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत देशात ४ हजार ३२५ जणा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (२३ एप्रिल) नियमित पत्रकार परिषदेत दिली आहे.
1229 new #COVID19 cases & 34 deaths reported in the last 24 hours. Total number of cases rises to 21700, including 16689 active cases, 4325 cured & 686 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/FgSsd5Fuco
— ANI (@ANI) April 23, 2020
देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या २८ दिवसात तब्बल १२ जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा ४ होता, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
As on today, we have 12 districts that did not have a fresh case in the last 28 days or more. There are now 78 districts (23 States/UT) that has not reported any fresh cases during the last 14 Days: Health Ministry
— ANI (@ANI) April 23, 2020
लॉकडाऊनमध्ये सरकारने दिली या दुकानांना सूट
सरकारने लॉकडाऊनमध्ये काही शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रीपेड मोबाइल रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानेही सुरू राहतील. प्रत्येक राज्यातील ज्येष्ठ नागरिक काळजी घेण्याबद्दल माहिती दिली असून त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे.
Home Ministry has clarified to states that in-house care-givers of senior citizens, prepaid mobile recharge utilities and food processing units in urban areas are exempted from lockdown restrictions: Punya Salila Srivastava, Joint Secretary, Ministry of Home Affairs pic.twitter.com/awCWr0rl41
— ANI (@ANI) April 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.