नवी दिल्ली | भाजप सरकार सीबीआयचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या प्रकरणात भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत ममता यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “पश्चिम बंगालमध्ये जे काही सुरू आहे, ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे आमची नाही,” असा आरोप जावेडकर यांनी केला आहे.
Union Minister Prakash Javadekar: Ye Mamata ji ki emergency hai Bengal mein. Hamari nahi hai, Mamata ji ki hai. pic.twitter.com/eI6PlVTLfX
— ANI (@ANI) February 4, 2019
“पश्चिम बंगालमध्ये कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अटक करणे हा लोकशाहीचा खून असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच ममतांना साथ देणारे विरोधी पक्षाचे नेते जामिनावर बाहेर आहेत. जे साथ देत आहेत ते महागठबंधन नाही तर ते एका दृष्टीकोणातून एकत्र आलेले नाहीत तर ते भ्रष्टाचारामुळे एकत्र आले आहेत. पुढे जावडेकर असे देखील म्हणाले की, ममता कोणाला वाचवत आहेत पोलिसांना की स्वतःला? असा घणाघातr आरोप ममतावर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Union Minister Prakash Javadekar: Opposition parties have supported Mamata Banerjee. Who are these people? They are out on bail. Such people are standing together. This is not Mahagathbandhan, they are divided by vision and united by corruption. The corrupt are standing together. pic.twitter.com/6MnC9mOrlL
— ANI (@ANI) February 4, 2019
आज (४ फेब्रुवारी) या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (५ फेब्रुवारी) सुनावणी घेणार आहे.
CBI plea in SC seeking directions to Kolkata Police Commissioner Rajeev Kumar to cooperate with the investigation in Saradha chit fund case: Chief Justice of India says "we will hear the matter tomorrow." https://t.co/qRltVtBtxJ
— ANI (@ANI) February 4, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.