श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे. या चार ही पोलीस कर्मचारी बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात आहे. यातील तीन पोलिसांची हत्या शुक्रवारी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. हे चार ही पोलीस कर्मचारी दक्षिण काश्मीर मधील शोपियान जिल्यातील होते.
या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही “राजीनामा द्या, देऊन ड्युटीवर जाऊ नका अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात आली होती. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.
Jammu & Kashmir: Three policemen who were kidnapped by terrorists in south Kashmir's Shopian, found dead. pic.twitter.com/OV9xwHrDBn
— ANI (@ANI) September 21, 2018
Jammu & Kashmir: Three policemen who were kidnapped by terrorists in south Kashmir's Shopian, found dead pic.twitter.com/egG7h10ozy
— ANI (@ANI) September 21, 2018
#JammuAndKashmir: 3 Special Police Officers (SPOs) and 1 police personnel have gone missing in South Kashmir's Shopian. More details awaited.
— ANI (@ANI) September 21, 2018
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून पोलिसांना टार्गेट केले जाते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण गेले. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये शोध मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे अपहरण करून खात्यावर दबाव आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.