HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या तीन प्रदेशाध्यक्षांच्या पदांचा राजीनामा

नवी दिल्ली | गुजरात मधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोलंकी, गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या तिघांच्या जागी युवा काँग्रेसच्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. या तिघांच्या जागी नक्की काँग्रेस कोणाची नेमणूक करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

नुकतेच काँग्रेसचे ८४ वे राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडले. यात महाअधिवेशनानंतर पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश आणि गोवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सलग सुरु असलेल्या राजीमाना सत्रामुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील इंधन दरवाढीला लगाम बसण्याची चिन्हे नाहीच

Gauri Tilekar

#NirbhayaCase : पुढील आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती

swarit

काश्मीरमध्ये निवडणुकीपुर्वीच दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Gauri Tilekar