HW News Marathi
Covid-19

देशात आत्तापर्यंत १ कोटींच्या पूढे लोकांना दिली कोरोनाची लस

नवी दिल्ली | देशात १ मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारील आणि फ्रन्टलाईन वर्कस यांना कोरोनाची लस देण्यात आली.

देशात आता कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये ६० वर्षावरील नागरिक आणि ज्या लोकांना गंभीर असे आजार आहेत अशा ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशात ५ मार्चच्या संध्याकाळपर्यंत १ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.

कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत भारत आता जगात दोन नंबरला आला असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारतात आता कोरोनाचा दुसरा डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत अमेरिका, भारत या देशांनंतर ब्रिटन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही हेच सांगत होतो !

News Desk