HW News Marathi
देश / विदेश

आज आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन १३ ऑक्टोम्बर रोजी साजरा केला जातो. आपत्ती व्यवस्थापनात पहिला टप्पा आपत्तीची तीव्रता घटविणे हा असतो.गेल्या अनेक वर्षांपासून युनो हि राबवत आहे. आपत्ती हे मानवी जीवनातील अपरिहार्य असे घटित आहे. लोकांना वादळे , भूकंप , आग , अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींबरोबरच युद्ध, दंगली, दहशतवादी हल्ले अशा मानवनिर्मित आपत्तींनाही तोंड द्यावे लागते. कोणत्याही आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन हाती घेणे व झालेल्या नुकसानीची नोंद करून नुकसान भरपाई देणे.

सर्वसाधारण आपत्तीचे तीन टप्पे ठरवण्यात आले आहे, यात पहिला टप्पा म्हणजे,आपत्ती परिसीमन याला आपण आपत्ती आकुंचन किंवा कपात असेही म्हणू शकतो.

दुसरा टप्पा म्हणजे, आपत्ती प्रतिसाद. तिसरा टप्पा म्हणजे,मदतकार्यः पुनर्वसन आणि पुनर्विकास यांचा समावेश हा होतो. आपत्ती ओढवू नये तसेच आपत्तीमुळे होणारे परिणाम कमी करणे यासाठी उपाययोजना हा मुख्य केंद्रबिंदू ठरला. सन २००५ मध्ये युनोच्या माध्यमातून ‘ ह्योगो कृती आकृतिबंध ‘ ठरविण्यात आला. त्यांनतर २००५ ते २०१५ या काळात युनोच्या सदस्य देशांनी या आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे मान्य केले. अनेक उद्देश समोर ठेऊन उपक्रम राबवण्यात आले. ते पुढील प्रमाणे,

२००४ मध्ये ‘ आपत्तीतून निर्माण होऊ शकणारे भविष्यातली प्रश्न

२००६मध्ये ‘ शालेय शिक्षणाद्वारे आपत्ती घटविण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग

२००९ मध्ये ‘ रुग्णालयांसाठी आपत्ती व्यवस्थापन

२०१०मध्ये ‘ आपले शहर आपत्तींपासून सुरक्षित

२०१२मध्ये ‘ महिलाः आपत्ती आकुंचनातील संवेदनक्षम घटक

२०१३ साठी ‘ अपंगांचे जीवनमान व आपत्ती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भगतसिंग यांना का दिली वेळेआधी फाशी ?

News Desk

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

अखेर हुकूमशाहीचा विजय झालाच !

News Desk