नवी दिल्ली | आज श्रीहरिकोटा येथून दोन ब्रिटीश उपग्रहांसह इस्रोचे पीएसएलव्ही-सी ४२ अंतराळात झेपावणार आहे. आजचे सॅटेलाईट प्रक्षेपण हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले आहे. पृथ्वीचे निरिक्षण करणाऱ्या या दोन उपग्रहांना वाहून नेणारे इस्त्रोचे पीएसएलव्ही-सी ४२ हे यान आज रात्री १० वाजून ८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून उड्डाण करणार आहे. नोवासार १ आणि एस१-४ हे दोन्ही उपग्रह पृथ्वीतील बदलांचा अभ्यास करणार आहेत.
Update #1#ISROMissions#PSLV#PSLVC42
Here's PSLV-C42 (Core Alone) sitting pretty on the First Launch Pad at Satish Dhawan Space Centre, Sriharikota. Two foreign satellites, NovaSAR & S1-4, are set to be launched into a 583 km Sun Synchronous Orbit, tomorrow.@PMOIndia pic.twitter.com/tcjUPeUGXk— ISRO (@isro) September 15, 2018
Update #2
We have begun the countdown today at 01:08 pm (IST) for the launch of #PSLVC42 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. The scheduled launch is at 10:08 pm (IST) tomorrow. Stay tuned for more updates.@PMOIndia #ISROMissions#PSLV pic.twitter.com/CKRzSQM5PV
— ISRO (@isro) September 15, 2018
देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी “२०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली होती. इस्रोची पुढील काही वर्षांसाठीची जय्यत तयारी पाहता ‘मिशन गगनयान’साठी आता इस्रो संपूर्ण सज्ज झाले असल्याचे दिसत आहे.
‘‘ इस्रोची २०१९ या वर्षात ‘चांद्रयान २’मोहीम ३ ते १६ जानेवारी दरम्यान सुरू होणार आहे. येत्या सात महिन्यात १९ अभियाने राबवणार आहे. त्यामध्ये १० सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह ९ यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. ऑक्टोबरमध्ये पीएसएलव्ही सी-४३ याचे प्रक्षेपण होणार असून नोव्हेंबरमध्ये जी सॅट ७ ओ आणि जी सॅट ११ या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी ४४ आणि जीसॅट ३१ अंतराळात सोडण्यात येणार आहेत,” अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.