नवी दिल्ली | इस्रोच्या ‘चंद्रयान-१’ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रो लवकरच ‘चंद्रयान-२’ मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. ३ जानेवारी २०१९ ते १६ जानेवारी २०१९ या कालावधीत इस्रोकडून ‘चंद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली आहे. इस्रोने मार्च २०१९ पर्यंत तब्बल १९ मोहिमा नियोजित केलेल्या आहेत.
.@isro has lined up 19 missions till March, 2019, Chairperson Kailasavadivoo Sivan explains the missions#ISRO pic.twitter.com/tkoOB7EDvp
— PIB India (@PIB_India) August 28, 2018
January 3 to February 16, 2019 is the window for launch of #Chandrayaan2: @isro chairman, K. Sivan pic.twitter.com/p5Y4vd2yu0
— DD News (@DDNewslive) August 28, 2018
इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात पाणी सापडल्याच्या केलेल्या दाव्याला नासाने देखील दुजोरा दिला. ‘चंद्रयान-१’ या यानाने चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाणी सापडल्याची माहिती आकडेवारीसह दिली होती. इस्रोच्या या शोधाला नुकतीच नासाने देखील पुष्टी दिली. इस्त्रोच्या ‘चंद्रयान-१ ’ सोबत ‘एम ३’ हे उपकरणदेखील पाठवण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.