मुंबई | जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे ऑलिम्पिक संघटनेला यावर्षी टोकियोत होणारी मानाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकातील बदलानंतर २०२१ ला होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी खेळाडूंसाठी नवे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. १ डिसेंबर २०२० ते २९ जून २०२१ पर्यंत आपली क्षमता सिद्ध करुन खेळाडूंना ऑलिम्पिंकचे तिकीट मिळवणे आता शक्य होणार आहे.
देशातील लॉकडाऊन हटवल्यानंतर अॅथलेटिक्स महासंघ स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी संधी उपलब्ध करुन देऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पात्रता स्पर्धेला स्थगिती देण्यात आल्याचेही जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने स्पष्ट केले आहे. ५ एप्रिलपर्यंत ज्या खेळाडूंनी पात्रता सिद्ध केली आहे. त्यांची ऑलिम्पिक एन्ट्री ग्राह्य मानली जाईल, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.