नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत १ हजार ५६८ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२ हजार ७२७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात भारतात ३ हजार ९०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
3900 #COVID19 cases & 195 deaths have been reported in the last 24 hours, the largest spike till now in both: Ministry of Health and Family Welfare https://t.co/Wi2KQBflAr
— ANI (@ANI) May 5, 2020
माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या ३२ हजार १३४ अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तापर्यंत देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २७.५२ टक्के इतकी आहे. देशातील विविध राज्यात झोननुसार काही ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे.
मृत्यूदरात पुन्हा वाढ
गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ३० एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १०७५ होती. परंतु गेल्या चार दिवसांत हा आकडा १ हजार ५००च्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या चार दिवसात जवळपास ५०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.