नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलीस यांच्यातील वादाचे पडसाद लोकसभेतही उमटले आहेत. या वादानंतर लोकसभेत मोठा गदारोळ माजला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन द्यायला सुरुवात केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात “सीबीआय तोता है” अशी घोषणाबाजी केली. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
HM Singh on the CBI action in Saradha chit fund case in West Bengal yesterday: The action was taken after SC had ordered an investigation into Saradha chit fund case . The Police Commissioner was summoned many times but he did not appear. pic.twitter.com/pM4vXdvExN
— ANI (@ANI) February 4, 2019
सर्वोच्च न्यायालयाने शारदा चिट फंड घोटाळ्या प्रकरणी चौकशी आदेश दिल्यानंतर अनेकदा कोलकत्ता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. यानंतर सीबीआय पथक कारवाई करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. परंतु स्थानिक पोलिसांनी त्यांना कारवाई करण्यापासून रोखले.
“केंद्राने कायमच राज्यांतील अधिकारांचा सन्मान केला आहे. त्याचप्रमाणे राज्यांतील अधिकाऱ्यांनीही केंद्राच्या संस्थांचा सन्मान करायला हवा”, असेही राजनाथ सिंह यांनी सभागृहात म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये काल (३ फेब्रुवारी) घडलेली घटना म्हणजे संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना त्यांचे काम करण्यापासून रोखणे योग्य नसल्याचेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले आहेत.
कोलकात्यात सीबीआयला कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. देशाच्या इतिहासात असे प्रथमच घडले. असे करून रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही यावेळी राजनाथ सिंह यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.