HW News Marathi
देश / विदेश

बारावीचा पेपर देताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नवी दिल्ली | हैदराबादमध्ये बारावीच्या बोर्डाचा पेपर सुरु असतानाच एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२ मार्च) घडली आहे. गोपी राजू (१९) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षेला जात असतानाच गोपी राजू यांच्या छातीत दुखत होते. मात्र, परिक्षा असल्याने त्याने रुग्णालयात जाणे टाळले. पेपर देत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती मिळत असून याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

गोपी राजू परिक्षेला जात असतानाच त्याच्या छातीत दुखू लागले होते. मात्र, परीक्षेच्या कारणास्तव त्यांने रुग्णालयात जाणे टाळले आणि तो परीक्षेसाठी गेला. परंतु, पेपर लिहीत असतानाच तो बाकावरून खाली पडला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार लावणार हजेरी

News Desk

लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो – नरेंद्र मोदी

News Desk

थरुर प्रेयसींना कसे भेटणार | सुब्रमण्यम स्वामी

News Desk