HW Marathi
देश / विदेश राजकारण

लेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरने मागितली माफी

नवी दिल्ली | लेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरने भारताच्या संसदीय समितीची लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. ट्विटरने याबाबत म्हटले आहे की, “३० नोव्हेंबरपर्यंत आम्ही आमची चूक सुधारू. भाजप खासदार मीनाक्षी लेखी याबाबत म्हणाल्या की, “ट्विटरच्या चीफ प्रायव्हसी ऑफिसरने पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आम्हाला आमची चूक मान्य आहे. लडाखचा काही भाग चुकीच्या जियो-टॅगिंगमुळे चीनचा भाग असल्याचे दाखले गेले आहे. आम्ही ही चूक दुरुस्त करत आहोत, त्यासाठी आम्हाला ३० नोव्हेंबर २०२० पर्यंतचा वेळ लागेल”.

ट्विटरवर भारताचा भाग चीनमध्ये दाखवण्यावरुन भारताने तीव्र आक्षेप घेत ट्विटरला सुनावलं होतं. या प्रकरणी भारत सरकारचे आय टी सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात साहनी यांनी ट्विटरला कठोर इशारा दिला होता, तसेच ट्विटरच्या अशा कृतींमुळे ट्विटरची केवळ प्रतिष्ठा कमी होत नाही, तर तटस्थता आणि निष्पक्षपणा यावरही प्रश्न उपस्थित होतात, असे म्हटले होते.

Related posts

श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- पंतप्रधान

News Desk

आणखी एक कथित सीडी व्हायरल

News Desk

लाॅकडाऊन मोडल्याप्रकरणी मंत्र्यांच्या मुलाशी हुज्जत घालणाऱ्या गुजरातच्या सुनिता यादवची बदली…!

News Desk