नवी दिल्ली | संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा घट्ट विळखा आहे. एकीकडे संपूर्ण जग या कोरोना विषाणूचा सामना करत असताना इतक्या कठीण स्थितीतही काहीच दिवसांपूर्वी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली होती. न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा स्वतः न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी केली होती. खरंतर, सोमवारी ८ जून रोजी न्यूझीलंडमधील कोरोनाचा अखेरचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने देशातील सर्व निर्बंध देखील हटविण्यात आल्याचे देखील जसिंडा आर्डेन यांनी सांगितले होते. मात्र, नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या या देशात आता दुर्दैवाने पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडमध्ये मंगळवारी (१६ जून) नवे २ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे दोन्ही प्रवासी ‘युके’हुन प्रवास करून आलेले आहेत.
Latest updates from @minhealthnz
There are 2 new confirmed cases of COVID-19 in New Zealand.
Two women from the same family, one in her 30s and the other in her 40s, who recently arrived from the UK via Australia have today been confirmed with COVID-19. pic.twitter.com/YDYueoFIR4
— Unite against COVID-19 (@covid19nz) June 16, 2020
न्यूझीलंडमध्ये नव्याने कोरोनारुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आल्यावर, “देशात आढळलेले दोन्ही कोरोनाबाधित हे ‘युके’मधून प्रवास करुन परतले आहेत. त्याचप्रमाणे, दोघांशीही संपर्क साधण्यात आला आहे”. तर या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान जसिंडा आर्डेन सतर्कतेचा इशाराही दिला आहे. “परदेशातले नागरिक न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतर येत्या काळात देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते”, असे जसिंडा आर्डेन यांनी म्हटले आहे. न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्यानंतर जगभरातून पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांचे कौतुक झाले आहे. मात्र, असं असताना काहीच दिवसांत त्यांच्यापुढे हे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.