HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी या ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनेशी या दोघांचाही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान, यावेळी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (३ नोव्हेंबर) देखील शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शोपियांनमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली होती.

 

Related posts

2 हजारांच्या बनावट नोटांचीही पाकिस्तानात छपाई

News Desk

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

News Desk

लढाऊ विमानाला आग, विमानाचे तुकडे तुकडे झाले तरी पायलट बचावला

News Desk