श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (३ डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोपियान जिल्ह्यातील सनग्रान परिसरात एक घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी या संपुर्ण परिसराला घेराव घातला आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एसओजी यांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे. त्यानुसार सनग्रानमध्ये एका घरात दहशतवादीलपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
#UPDATE Shopian encounter: Two terrorists reported to be trapped, firing stopped at present, a search is currently underway. More details awaited. #JammuAndKashmir https://t.co/F4Od23QKgX
— ANI (@ANI) December 3, 2018
दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (२४ नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.