HW News Marathi
देश / विदेश

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार 

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी मोठी घडामोड दिल्लीत घडणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज (११ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. उदयनराजे भोसले आज संध्याकाळी ५.३० वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी भेटीला जाणार आहेत. दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे.

शरद पवार आणि उदयनराजे हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्येही भेट होऊ शकते. परंतु ज्या अर्थी उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार आहेत त्या अर्थी या भेटीत नक्कीच काही खास असणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सप्टेंबर २०१९मध्ये उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच गळती लागलेल्या राष्ट्रवादीला उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्याने आणखी एक धक्का बसला होता.

विधानसभा निवडणुकीच्या काळात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि शरद पवारांनी ती प्रतिष्ठेची केली. १८ ऑक्टोबर २०१९ला सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादीची जाहीर सभा होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु 80 वर्षांच्या शरद पवारांनी तरीही माईक हातात घेत उपस्थितांना शाब्दिक सल्ले दिले होते. पवारांच्या भाषणाने इतिहास घडला होता. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या पराभाव झाला. त्यांच्या पराभवाला शरद पवारांचं हे भाषणच कारणीभूत ठरल्याचं म्हटलं गेलं. यानंतर भाजपने उदयराजेंना राज्यसभेवर पाठवलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

News Desk

गुजरात मध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ नवे, जुन्या मंत्र्यांना श्रीफळ

News Desk

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती

News Desk