HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीला मोठा धक्का, न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला जामीन अर्ज

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटीचा चुना लावून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी (८मे ) तिस-यंदा जामीन फेटाळून लावला. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील मुख्य मॅजिस्ट्रेट एम्मा आर्बुथनॉट यांच्या न्यायालयात नीरव मोदी हजर होता. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ३० मे रोजी होणार आहे.

नीरव मोदी याला ब्रिटनमधून स्कॉटलँड यार्डने १९ मार्च रोजी अटक केली होती. याआधी २९ मार्च आणि २६ एप्रिलला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वेस्ट मिन्स्टर न्यायालयात व्हिडीओ लिंकव्दारा मोदी हजर झाला होता. वँडस्वर्थ कारागृहात तो अनेक दिवसांपासून कैदेत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चांद्रयान – २’च्या यशानंतर आता इस्रो सूर्याला गवसणी घालणार

News Desk

काँग्रेस उमेदवार अलका लांबांनी ‘आप’च्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली

swarit

शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर पून्हा एकदा हल्लाबोल 

News Desk