नवी दिल्ली | उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आसाममधील तिनसुकिया या शहरात ५ तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी ६ जणांचे अपहरण केले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीवर नेऊन तेथे गोळ्या घातल्या. ज्यात ४ जणांचा जागीच तर एकाच रुग्णालयात जाताना मृत्यू झाला आहे. एका जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Terrible news coming out of Assam. We strongly condemn the brutal attack in Tinsukia and the killing of Shyamlal Biswas, Ananta Biswas, Abhinash Biswas, Subodh Das. Is this the outcome of recent NRC development ? 1/2
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 1, 2018
Deeply anguished by civilian casualties in an attack in Upper Assam region. It is a reprehensible act of mindless violence. Spoke to Assam CM Shri @sarbanandsonwal regarding the incident and asked him to take strict possible action against the perpetrators of this heinous crime.
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 1, 2018
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तिनसुकियामध्ये तरुणांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे. ‘हे सगळं एनसीआरमुळेच झालं असल्याची शंका देखील ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.