नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३५ अ आणि ३७० कलम वरून वातावरण चांगले तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काश्मीर प्रश्नावर निवेदन सादर केले असून कलम ३७० मधील काही तरतुदी वगळणार असल्याचे शहा यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शहांकडून सभागृहात मांडण्यात आला. सोबत जम्मू काश्मीरचे पुनर्गठनही होणार. या सर्व तरतुदी असलेले विधेयक राज्यसभेत मांडले.
काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना नजर कैद करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा चर्चेला आणावा अशी मागणी काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी राज्यसभेत केली. या पार्श्वभूमीवर आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सकाळी ९.३० वाजता महत्वापूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर शहा राज्यसभेत निवेदन सादरण्यासा सुरुवात केली. लोकसभेत १२ वाजता केंद्र सरकारकडून निवेदन सादर करणार आहेत. राज्यसभेत शहा यांनी काश्मीर संदर्भात बोलताना राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली
https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/1371907589631309/
LIVE
- शेअर बाजार कोसळला असून एनईफेटी ५०० पाईंटने कोसळले
- जम्मू-काश्मीरध्ये तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ८ हजार सैन्य पाठविण्यात आले आहे. या सैन्यांना विशेष विमानाने काश्मीरमध्ये नेहण्यात येणार आहे.
- पाकिस्तानच्या संसदे देखील काश्मीर मुद्द्यांवर आज दुपारी २ वाजता विशेष बैठक बोलविण्यात आली आहे.
- पीडीपी खासदारांनी रुद्रावतार धारण करताना स्वतःचे कपडे फाडले. त्याचबरोबर राज्य घटनेची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला. संसदेत पीडीपीच्या खासदारांनी स्वत:चे कपडे फाडून आंदोलन करत संसदेतून बाहेर पडले
PDP’s RS MPs Nazir Ahmad Laway&MM Fayaz protest in Parliament premises after resolution revoking Article 370 from J&K moved by HM in Rajya Sabha; The 2 PDP MPs were asked to go out of the House after they attempted to tear the constitution. MM Fayaz also tore his kurta in protest pic.twitter.com/BtalUZMNCo
— ANI (@ANI) August 5, 2019
- कलम ३७० हटविण्यासाठी एका मिनिट देखील उशीर होता कामा नये. – अमित शहा
Home Minister Amit Shah in Rajya Sabha: Article 370 hatane mein ek second ki bhi deri nahi karni chahiye. pic.twitter.com/FpaqV67uAG
— ANI (@ANI) August 5, 2019
मोदी सरकारचे चार ऐतिहासिक प्रस्ताव
-
जम्मू-काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 4 ऐतिहासिक प्रस्ताव
-
पहिला प्रस्ताव : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० अंशतः रद्द करणे
-
दुसरा प्रस्ताव : जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळे केले
-
तिसरा प्रस्ताव : जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करणे (विधानसभा असलेला)
-
चौथा प्रस्ताव : लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करणे (विधानसभा नसलेला)
- थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करणार
- आपण संविधान वाचविण्यासाठी संरक्षणासाठी प्राणाची आहूती देखील देतो, परंतु भाजप सरकारने देशातील संविधानची हत्या असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांनी म्हटले आहे.
GN Azad,Cong: I strongly condemn the act of 2-3 MPs(PDP’s Mir Fayaz and Nazir Ahmed Laway who attempted to tear constitution). We stand by the constitution of India. Hum Hindustan ke samvidhaan ki raksha ke liye jaan ki baazi laga denge, but today BJP has murdered constitution pic.twitter.com/wtswg0s7dK
— ANI (@ANI) August 5, 2019
- आजचा दिवस हा लोकशाहीचा काळा दिवस असल्याचे ट्वीट काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत म्हटले आहे
Today marks the darkest day in Indian democracy. Decision of J&K leadership to reject 2 nation theory in 1947 & align with India has backfired. Unilateral decision of GOI to scrap Article 370 is illegal & unconstitutional which will make India an occupational force in J&K.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 5, 2019
- गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करण्यात आले आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ ऑगस्टला संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे
- केंद्र सरकारच्या निर्णयानुसार लडाख विधानसभा नसणार
- बहुजन समाज पार्टीनं कलम 370 हटवण्यासाठी मोदी सरकारच्या प्रस्तावाचं राज्यसभेत समर्थन केले आहे.
- काश्मीरपासून लडाख वेगळे होणार
- जम्मू-काश्मीर आणि लडाक आता केंद्र शासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला, यानंतर काश्मीरची पूर्नरचना होणार
HM Amit Shah: Jammu and Kashmir to be a union territory with legislature and Ladakh to be union territory without legislature pic.twitter.com/nsEL5Lr15h
— ANI (@ANI) August 5, 2019
- मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कलम ३७० अंशत: रद्द
- आता ३७० कलममधील एकच खंड राहणार
Resolution revoking Article 370 from J&K moved in Rajya Sabha. pic.twitter.com/ayUAqJdb6o
— ANI (@ANI) August 5, 2019
- कलल ३७०वर राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी स्वाराक्षरी केली आहे
- कलम ३७० मधील काही तरतुदी वगळणार असल्याचे राज्यसभे सांगितले – अमित शहा
- माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना नजर कैद करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा चर्चेला आणावा अशी मागणी काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी राज्यसभेत केली.
- मोदी सरकारने भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
- अमित शाहांनी या विधेयकावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले असले तरी विरोधकांनी मोठा गदारोळ केला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत पोहचले
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहचले
- केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक संपली, गृहमंत्री अमित शहा बैठकीबाबत लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन सादर करणार
- काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या वेगवान घडामोडी ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. अनेक भागात सीआरपीएफच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
- केंद्रीय गृह मंत्री अमित शहा राज्यसभेत ११ वाजता आणि लोकसभेत १२ वाजता केंद्र सरकारकडून निवेदन सादर करणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.