नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगदीशपूरमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याचा पोलीस कोठडीत असतानाच मृत्यू झाल्याची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज (२० ऑक्टोबर) दिल्लीहून या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाल्या. मात्र, पोलिसांनी प्रियांका यांना यमुना एक्सप्रेस वे वरच रोखून ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त आहे. लखनौ पोलिसांकडून कलम १४४ आणि कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे.
Lucknow | Congress leader Priyanka Gandhi Vadra detained on her way to Agra to meet family of sanitation worker who died in police custody
Police say, Section 144 is imposed here. pic.twitter.com/tAHHryer7U
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 20, 2021
पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. स्वतः प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ ट्विट केलं आहे. “एखाद्या व्यक्तीला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार करणं हा कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत घडलेली अरूण वाल्मिकी यांच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे, या पीडित कुटुंबाला भरपाई दिली जावी”, अशी मागणी देखील प्रियंका गांधी यांनी केली आहे. दरम्यान, प्रियांका यांना ताब्यात घेतल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे.
आग्रा येथील जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. परंतु, ही हत्या असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. या प्रकरणी यापूर्वी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाईत करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रियंका गांधी या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येत असताना यमुना एक्सप्रेस वे च्या एन्ट्री पॉईन्टवर पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं आणि परत जाण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, परतण्यास नकार दिल्यानंतर प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.